सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली

गोंदवले : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी गर्दीने फुलली होती दुसऱ्या छायाचित्रात खेळण्यांचा आनंद घेताना लहान मुले.

गोंदवले- गोंदवले बुद्रुक येथे श्रीब्रम्हचैतन्य पुण्यतिथी महोत्सव सुरू असून शनिवार आणि रविवार या सलग सुट्ट्यांमुळे मंदिर परिसर आणि बालगोपालांसाठी आलेल्या पाळणे व पाण्यातील खेळण्यांकडे लहान मुले आणि भाविकांनी आज गर्दी केली होती. गर्दीने गोंदवले नगरी चैतन्यमय झाली आहे.

गोंदवलेत श्रींचा 105 वा पुण्यतिथी महोत्सव दत्त पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झाला आहे. या दहा दिवसांत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. दि. 31 हा पुण्यतिथी महोत्सवाचा मुख्य दिवस आहे. शनिवारी आणि रविवार सलग सुट्या असल्याने जिल्ह्यासह अनेक ठिकाणच्या भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. आज सकाळपासून हजारो भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले तर बाळगोपाळांचीही मोठी गर्दी होती. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुलांना करमणूक म्हणून मंदिराच्या परिसरात मोठे व्हील चक्र, मिकी माऊस, लहान गाड्या, रेसच्या गाड्या, पाण्यात तरंगणारी खेळणी आलेली असून याठिकाणी प्रचंड गर्दी दिसत होती. लहान मुले पालकांच्याकडे या खेळण्यात बसण्यासाठी हट्ट करत होती. पाण्यातील खेळण्याला लहान मुले विशेष पसंती देत होती तर मोठी मुले त्या व्हील चक्रात बसून आनंद घेत होती. हायस्कुलच्या समोरून ते आप्पा महाराज चौकापर्यंत दुतर्फा व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली असून यामध्ये प्रसाद मेवा मिठाई कंदी पेढे बत्तासे यांचे स्टोल लागले आहेत.

लहान मुलांसाठी प्लास्टिक खेळणी विक्री करणाऱ्या व्ययसायिकांनी नवनवीन खेळणी विक्रीसाठी मांडली आहेत. वाचनीय पुस्तके, पर्स, रुमाल, जर्कीन, ज्वेलरी गृहपयोगी वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात आली असून यासगळ्या ठिकाणी खरेदीसाठी आज मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)