नागरी सुविधांसाठी ब्ल्यू फोर्सचा ‘रास्तारोको’

सातारा – येथील माजगावकर माळ येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ब्लु फोर्सच्या कार्यकर्त्यानी रस्ता रोको आंदोलन केले. माजगावकर माळ गेंडामाळ झोपडपट्टी येथे अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. सदर ठिकाणी राहत असणाऱ्यांना आजपर्यंत कोणत्याही नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. हा भाग त्रिशंकू असल्याने नगरपरिषद तसेच ग्रामपंचायत शहापुरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

जिल्ह्यातील महत्वाचे असलेले आकाशवाणी केंद्र या दूरवस्थेच्या झळा कित्येक वर्षे सहन करत आहे. अकाशवाणीच्या रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे, खराब रस्ता यातून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे.येथे सांडपाणी व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच सर्व पाणी सोडले जाते. या मुळे साथीचे आजार पसरून आरोग्याचा प्रश्‍न देखील निर्माण झाला आहे. या सोबतच झोपडपट्टी अंतर्गत असणारे रस्ते कित्येक वर्षे आहे तसेच आहेत. खांबावरील लाईट व रस्त्यावरील पथदिवे नादुरुस्थ आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झोपडपट्टीत अंतर्गत गटारे नाहीत. ती तातडीने बांधून सांडपाण्याच्या प्रश्‍न कायमचा सोडवावी तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये बांधून मिळावी. या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये शहर अध्यक्ष रवींद्र बाळासाहेब बाबर, शोभा बाबर , सचिन कांबळे, संतोष साठे, अस्लम शेख, रवींद्र शेडगे, अश्‍विन भिसे, अमोल जानराव, पंकज माने, सुरेश अडागळे, व ब्लु फोर्स कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

पुलाची अवस्था दयनीय

सातारा शाहूपुरी पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. त्याच्या आजूबाजूला कोणत्याही स्वरूपाचे रेलिंग नाही. ओढ्यामध्ये पडून मोठ्या स्वरूपाची दुर्घटना घडल्यावर प्रशासन लक्ष देणार का? पुलाशेजारी ओढ्यात उघड्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने कचऱ्याचे साम्राज्य दूर होणार का? रस्त्याची दुरुस्ती होणार का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)