खटावमध्ये वाळू सम्राटांना दणका

66 लाखांचा मुद्देमाल ताब्यात, नऊ जणांवर गुन्हा

वडूज -खटाव तालुक्‍यातील भुरकवडी गावच्या हद्दीत येरळा नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी धडक कारवाई करून दोन जेसीबी, दोन डंपरसह, दोन ट्रक सह अन्य दोन चारचाकी वाहने ताब्यात घेतली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 66 लाख 60 हजारांचा किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला असून खटाव तालुक्‍यातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भुरकवडी, गावच्या हद्दीत येरळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोरेगाव ठाण्याच्या पोलिस पथकाने बुधवारी सकाळी सहा वाजता छापा टाकला. त्याठिकाणी विनापरवाना वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले.

कारवाईत धरपकड, अनेकांचे पलायन

भुरकवडी येथे येरळा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपशावर श्रीमती कट्टे व पोलिसांनी धाड टाकल्यानंतर त्याठिकाणी वाळूमाफिया व त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली होती. त्यावेळी संबंधितांनी ताब्यात घेण्यासाठी पोलीसांची धरपकड सुरू होती. ही धडक कारवाई लक्षात येताच घटनास्थळावरून अनेक समर्थकांनी पलायन केले. या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

घटनास्थळावरून पोलिसांनी सुधीर नंदकुमार गोडसे, आकाश सुभाष गोडसे (रा. वडूज) यांच्या मालकीचे विना क्रमांकाचे दोन जेसीबी, प्रमोद आबासाहेब देशमुख (रा. वडूज) यांच्या मालकीच्या ट्रकात (एम.एच. 11 ए.एल. 2849) सुमारे 30 हजारांची चार ब्रास वाळू, शशिकांत आबाजी काळे (रा.वडूज) यांच्या ट्रकात (एम. एच. 10 झेड 4695), 30 हजारांची चार ब्रास वाळू, सुधीर नंदकुमार गोडसे यांची चारचाकी (एम.एच. 11 बी. आर. 7070), राहूल दादासाहेब पवार यांची चारचाकी (एमएच 11 बी. एच. 5369), अन्य एक चारचाकी (क्रमांक एम.एच. 11 ए. डब्ल्यू. 7726) इतकी वाळू तसेच वाहने मिळून 66 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बाळकृष्ण मारूती बरकडे (रा. नढवळ ता.खटाव), समीर नंदकुमार जगदाळे (रा. सिद्धेश्‍वर कुरोली), किर्तीराज शिवाजी पाटोळे, प्रतीक रमेश गोडसे, सुधीर गोडसे, प्रमोद देशमुख, राहूल पवार, शशिकांत काळे, आकाश गोडसे (सर्वजण रा. वडूज) अशा नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश राठोड, हवालदार राजेंद्र जाधव, संतोष नाळे, सतिश कर्पे, पोपट बिटुकले, किशोर भोसले, गणेश कापडे, सचिन राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबतची फिर्याद उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)