लाभधारकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा

वाई - शासकीय कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल : वाईतील शासकीय कार्यालयांची केली पहाणी

वाई – जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सोमवार, 24 रोजी वाईतील सर्व शासकीय कार्यालयांना भेटी देवून कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली. तसेच केंद्र शासनाने बेघर लोकांसाठी कार्यान्वित केलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा आढावा घेवून ही योजना जास्तीत-जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींना सूचना करीत या योजनेचा दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, तहसीलदार रमेश शेंडगे, मुध्याधिकारी विद्या पोळ, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी व नगरसेवक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, पंतप्रधान आवास योजना ही सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय लाभदायक असून दारिद्य्र रेषेखालील नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधून आवश्‍यक त्या कागद पत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच यासाठी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यावा. जिल्हाधिकारी यांनी अचानक भेट देवून प्रांत, तहसीलदार, वाई नगरपालिका कार्यालयाला भेट देवून प्रशासकीय पाहणी करत अनेक सूचना केल्या. दरम्यान त्या मंगळवारी वाईच्या औद्योगिक वसाहतीतील सोनापूर येथील पालिकेच्या कचरा डेपोला भेट देणार आहेत.

“पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या पाच वर्षात 1237 घरकुलांचे उद्दिष्ठ देण्यात आले असून पैकी 330 घरकुलांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील पात्र लाभार्थींचा सर्वे केला असून त्या योजनेची तांत्रिक माहिती देण्यासाठी तीन वेळा कार्यशाळा आयोजित केली होती. तरी वाई शहरातील पात्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा.
-विद्या पोळ, मुख्याधिकारी, वाई नगरपालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)