ऊस ट्राॅली-दुचाकीच्या धडकेत युवक ठार

कोरेगाव – सद्‌गुरूनगर, कोरेगाव येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. सिद्धेश्वर किरोली, ता. खटाव येथून पाहुण्यांना भेटून गावी येताना हा अपघात झाला. अभिजित विजय काळे वय 24 असे मृताचे नाव आहे. दरम्यान अपघातानंतर ट्रॅक्‍टर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सिद्धेश्वर किरोली ता. खटाव येथून अभिजित विजय काळे हा मित्र निलेश शंकर नलवडे याला सोबत घेऊन निलेशच्या कोरेगाव येथील नातेवाईकांकडे मोटारसायकलने दि. 23 रोजी दुपारी आले होते. रात्री 11वाजता गोळेवाडी फाट्याजवळील एका हॉटेलात जेवण करून रहिमतपूरमार्गे खटावकडे निघाले होते. कोरेगाव येथील कुमठे फाटा, सद्‌गुरूनगर येथे आले असता कोरेगावकडून जरंडेश्वर कारखान्यावर ऊस घेऊन निघालेल्या महिंद्रा ट्रॅक्‍टर (एमएच 11 व्ही 7899) ट्रॅक्‍टरला जोरदार धडक बसली.

या अपघातात अभिजीत काळे जागीच ठार झाले तर निलेश नलवडे गंभीर जखमी झाले. याबाबतची खबर कोरेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नातेवाईकांनी घटनास्थळी येवून निलेश नलवडे यांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

अभिजित काळे यांच्या मृतदेहाचे कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सिद्धेश्वर येथे सायंकाळी 5:30 च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबतची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली असून तपास पी.एस.आय. डी. डी. चौगुले करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)