औंध-पंढरपूर, वडूज-सोलापूर एसटी फेऱ्या मायणीमार्गे करा

मेघाताई पुकळे यांचे आगार प्रमुखांना निवेदन

वडूज : औंध-पुसेसावळी-म्हासुर्णे-मायणी-कलेढोण-झरे-दिघंची ते पंढरपूर तसेच वडूज-मायणी-कलेढोण-सोलापूर अशा बसेस सुरू व्हाव्यात अशी मागणी खटाव पं. स. सदस्या मेघाताई पुकळे यांनी निवेदनाद्वारे वडूज आगारप्रमुख यांच्याकडे केली आहे. सातारा विभागाकडेही मागणीचे निवेदन पाठवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवेदनात म्हटले आहे की, पुसेसावळी-चोराडे-म्हासुर्णे-चितळी-मायणी-विखळे-कलेढोण-तरसवाडी या खटाव तालुक्‍यातील पूर्व-पश्‍चिम गावातून मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जातो. या राज्यमार्गावर दिवसभरात पंढरपूर-सोलापूरकडे जाणारी एकही बस नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यापूर्वी पाटण आगाराची पाटण-पंढरपूर ही बस कित्येक वर्षे मायणी-कलेढोण या मार्गाने जात होती. परंतु, ही बस अचानक बंद करण्यात आली. तसेच कराड-पंढरपूर, कराड-सोलापूर या बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

पाण्याचा दुष्काळाबरोबरच आता बसेसचाही दुष्काळ पडल्याने भागातले दळणवळण कसे सुधारणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या भागातील बरेचसे नागरिक उदरनिर्वाहासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले आहेत. अनेक गलाई बांधव आंध्र; कर्नाटक; तामिळनाडू भागात आहेत. या सर्व ग्रामस्थांना गावाकडे पंढरपूर-सोलापूरपर्यंत रेल्वेने यावे लागते. तेथून या भागात येण्यासाठी एकही बस नसते. त्यामुळे म्हसवड किंवा विटा मार्गाने यावे लागते. यात वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे औंध-पंढरपूर व वडूज-सोलापूर या बसेस कलेढोण-मायणी मार्गे सुरू करण्याची गरज असेही निवेदनात म्हटले आहे.

सकाळी म्हासुर्णे-चितळी येथून महाविद्यालयासाठी विद्यार्थी आणण्यासाठी मायणीतून मोकळी बस म्हासुर्णेला जाते. त्यामुळे वडूज आगाराने सकाळी 7 वाजता पुसेसावळी-पंढरपूर-सोलापूर बस सोडली तर म्हासुर्णे-चितळी येथील विद्यार्थ्यांना या बसने मायणी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सकाळी येता येईल व मायणी-म्हासुर्णे या बसची 1 फेरी वाचून इंधन व वेळेची बचत होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)