पाटणकरांचे एकही काम दिसत नाही : आ. शंभूराज

काळगाव – माजी आमदारांना स्वत:चा अमृतमहोत्सव साजरा करताना त्यांचे मागील पाच वर्षात मतदारसंघातील जनतेच्या डोळ्याला दिसेल असे एकही काम करता आले नाही. त्यामुळेच त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन 1983 पासून केलेल्या कामांचे फोटो टाकून शुभेच्छा देण्याची वेळ आली आहे. मी पोकळ घोषणा करीत नाही तर प्रत्यक्षात कामे करतो, असा टोला आ. शंभूराज देसाई यांनी पाटणकर पितापुत्रांना लगाविला आहे.

ढोरोशी फाटा ते जुगाईवाडी, ता. पाटण या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, कारखान्याचे संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर, बबनराव भिसे, संचालक अभिजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आ. देसाई म्हणाले, आमच्या दादांनी डोंगराएवढा विकास केला असे सांगणारे त्यांचे सुपुत्र, दादांनी जर डोंगराएवढा विकास केला असता तर तालुक्‍यात विकासाचा एवढा अनुशेष का शिल्लक राहिला असता. सन 2009 ते 2014 या काळात आपण अल्पशा मतांनी पराभूत झालो. त्यावेळी पाटणकर आमदार होते आणि त्यांचेच पक्षाचे सरकार सत्तेत होते. 2009 पासून पुढील पाच वर्षात त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारकडून तालुक्‍यासाठी किती निधी आणला आणि 2014 पासून गत साडेचार वर्षात मी युतीच्या सत्तेत असणाऱ्या सरकारकडून किती निधी आणला आहे. मात्र ओढून ताणून आम्हीही काही तरी केले असे पाटणकरांनी दाखविण्याची काही गरज नसल्याची टिकाही आ. देसाई यांनी बोलताना केली.

कार्यक्रमास घोट व परिसरातील गावचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत रणजित शिंदे यांनी केले. भानुदास शिंदे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)