वाहतुकीच्या कोंडीने सातारकर त्रस्त

सातारा : राधिका संकुल येथे दुतर्फा वाहनांचे पार्किंग केल्याने लग्नाच्या वेळी वाहतुकीची कायमच कोडी होते.

सातारा – सातारा शहरात ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहतुक व्यवस्थापन करणे अत्यंत अवघड बनले आहे. त्यात असून अडचण नसून खोळंबा अशी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची आवस्था आहे. सध्या लग्न सराई मोठ्या जोरात सुरू असल्यामुळे शहरातील विविध मंगलकार्यालयाबाहेर वाहतुकीची कोडीची समस्या सातारकरांची डोके दुखी बनली आहे.

सातारा वाहतुक शाखेच्यावतीने संबधित रसत्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयांना याबाबत स्वत:चे सुरक्षा रक्षक नेमुन वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी सूचना देणे आवश्‍यक बनले आहे. ज्या ठिकाणी असे कोण करत नसेल त्यांना दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आता आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लग्न समारंभाची मिरवणुक जेंव्हा निघते तेव्हा पूर्ण रस्ता बंद होतो. अशा वेळी देखील वाहतुकीच्या कोंडीचा अनुभव येतो. मंगल कार्यालयाबाहेर मोठ्या कमानी रस्त्यावरतीच उभारल्या जातात. त्यात मंगल कार्यालयांना स्वत:चे सुसज्ज पार्किंग व्यवस्था असणे आवश्‍यक आहे.

लग्नासाठीच्या शहरामध्ये काढण्यात येणाऱ्या मिरवणुका त्यात डॉल्बी वाजविण्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदुषण होते. विविध मंगल कार्यालयामध्ये भरपूर भाडे आकारले जाते मात्र त्याठिकाणी सुविधांची वानवाच अनुभवयाला मिळते. सातारा वाहतुक शाखेने तातडीने सर्व मंगल कार्यालय मालक व व्यवस्थापकांना याबाबत सूचना द्याव्यात , कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)