खटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम

खटाव : प्लास्टिक निर्मूलन मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.

खटाव – खटाव परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार दि. 29 रोजी प्लास्टीक निर्मुलन मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शाळा, महाविद्यालयांना लेखी सूचना देण्यात आल्या.

अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी एकत्रीत येऊन प्रभात फेरी काढली. प्रत्येकाला विभागून दिलेल्या आपापल्या भागाची स्वच्छता करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्लास्टीक न वापरण्यासंदर्भात व ओला व सुका कचरा वेगळा करण्या संदर्भात घोषणेद्वारे समाज प्रबोधनही करण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सरपंच,उपसरपंच, सदस्य, कर्मचारी तसेच शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)