समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे

वाई : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील वत्कृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वाती हेरकळ यांच्या हस्ते स्विकारताना सायुरी सणस समवेत शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत इतर मान्यवर. (छाया : धनंयज घोडके)

आ. दत्तात्रय सावंत : वाई तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

वाई – देशाच्या प्रगतीसाठी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे आहे. वैज्ञानिक चळवळीसाठी शासन दरबारी प्रश्न मांडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न कणार असल्याचे आमदार दत्तात्रय सावंत यांनी सांगितले. वाई तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आसरे येथील कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय येथील कार्यक्रमास स्वाती हेरकळ, उपशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे. कृती समितीचे अध्यक्ष विजयराव येवले, गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर आदी उपस्थित होते.

आ. सावंत म्हणाले, आज देश अंधश्रध्दा, पर्यावरण प्रदूषण, दुष्काळ अशा वेगवेगळ्या स्तरावर लढत आहे. या सर्व प्रश्नांवर लोकांमध्ये जागृती करण्याचे काम विज्ञान प्रदर्शनातून होत आहे. विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढावी, त्यांच्यातून भविष्यातील शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत. त्यांनी देशातील विविध प्रश्नावर उपाय शोधावेत. यासाठी वैज्ञानिक चळवळीची गरज आहे. ही चळवळ नेटाने पुढे नेण्याचे काम शिक्षकच करू शकतो. यासाठी भरीव निधीची आवश्‍यकता असून शिक्षक आमदार म्हणून शासनाकडे विशेष प्रयत्न करू.

स्वाती हेरकळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुधीर महामुनी, सचिन नलवडे, कमलाकांत म्हेत्रे यांची भाषणे झाली.

विज्ञान प्रदर्शनातील विजेते पुढीलप्रमाणे अनुक्रमे तीन क्रमांक

शैक्षणिक उपकरणे लहान गट : सुदर्शन मोजर (बापूसो शिंदे माध्यमिक विद्यालय चिखली), आशुतोष व आदित्य शिंग (परखंदी हायस्कूल, परखंदी), पुष्कर शिंदे (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भुईंज). मोठा गट – गणेश चव्हाण (कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय आसरे), शुभम नवले व विवेक गायकवाड (म. गांधी विद्यालय, पाचवड), ऐश्वर्या कळंबे व आकाश हगवणे (नरसिंह हायस्कूल, धोम).

शिक्षक उपकरणे गट : सौ.सुरेखा ससाणे (जि. प. शाळा वाशिवली), अपराध आदम व जयवंत जाधव (बाळासो पवार विद्यालय उडतरे), अंजुषा हिंगसे (कन्याशाळा वाई). निबंध स्पर्धा – प्राथमिक गट – श्वेता शिंदे. समृध्दी कांबळे, श्रावणी शेडगे. माध्यमिक गट – अनुष्का जाधव, ईश लिलाद, केजल पेठकर, वत्कृत्व स्पर्धा – प्राथमिक गट – सायुरी सणस, संजना भिलारे, पियुष धुरगुडे.

माध्यमिक गट – अथर्व खरे, अंजली रेणुसे, वैष्णवी मोरे. प्रश्नमंजूषा स्पर्धा – प्राथमिक गट – शुभंकर अष्टपुत्रे, प्रणाली शिंदे, अमृता शिंदे, संचिता चोरट, सुदर्शन मोजर, साहिल चोरगे, माध्यमिक गट – वेदांतिका वाघ, सिध्दार्थ बांदल, अक्षय महांगडे, आशुतोष सणस, समृध्दी पवार, कांदबरी नलवडे, मुख्याध्यापक मारुती ससाणे व संतोष शिंदे यांनी स्वागत व परिचय केला.

रविंद्र लटिंगे, उत्तम कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू मेमाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास रोहिडेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक चंद्रकांत सणस, बापू पाटील, दिनकर सणस, बाबुराव चोरट, सदाशिव हगवणे, केंद्रप्रमुख विजय भांगरे, राजेंद्र गायकवाड, विठ्ठल माने, किरण बाबर, बापूराव चोरट, शेखर जाधव, सरपंच, ग्रामस्थ व विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)