अवैध मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी कारवाई

नागठाणे – अवैधरित्या मुरूम उत्खनन करून वहातुक करत असताना अपशिंगे मंडलाधिकाऱ्यांनी बोरगाव पोलिसांच्या मदतीने शनिवारी सकाळी कारवाई केली. यावेळी एक जेसीबी व मुरूम भरलेल्या दोन ट्रॅक्‍टर ट्रॉली महसूल विभागाने ताब्यात घेतल्या आहेत.

याबाबत महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी अपशिंगे (मि.) ता. सातारा गावच्या हद्दीत अपशिंगे ते वर्णे जाणाऱ्या रस्त्यानजीक जेसीबीच्या साहाय्याने मुरूम उत्खनन केले जात असल्याची माहिती मंडलाधिकारी वैभव सोनवणे यांना मिळाली. त्यांनी खोजेवाडी तलाठी हणमंत निकम यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी मुरूम उत्खनन करत असलेल्यांकडे परवान्याची चौकशी केली असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे आढळल्याने त्यांनी घटनास्थळावर असणारी जेसीबी व मुरूम भरलेल्या दोन ट्रॅक्‍टर ट्रॉली बोरगाव पोलीस ठाण्याकडे नेण्यास सांगितले. यावेळी संबंधितांनी त्याला नकार दिल्याने मंडलाधिकाऱ्यांनी सपोनि संतोष चौधरी यांना फोनवर माहिती दिली. सपोनि संतोष चौधरी व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संतोष हाटेकर यांचा जेसीबी व धनाजी घोरपडे व मंगेश मदने यांच्या ट्रॅक्‍टर, ट्रॉली बोरगाव पोलीस ठाण्यात आणली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)