मद्यपी दुचाकी चालकावर कारवाई

सातारा – दारू पिवुन दुचाकी चालवल्याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद झाला आहे. सातारा शहर वाहतूक शाखने ही कारवाई केली आहे. अभिजीत अशोक होनराव असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीधारकाचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक शाखेचे सुरज रेळेकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अभिजीत हा रविवारी दुपारी एकच्या सुमारास पोवई नाक्‍यावरून गोडोलीच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी तो त्याच्याकडील दुचाकी वेडीवाकडी चालवत असल्याने रेळेकर यांनी त्याला थांबवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यावेळी तो दारू पिल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी तो दारू पिल्याचे तपासणीत उघड झाल्याने त्याच्या विरोधात रेळेकर यांनी तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)