म्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी

संग्रहित छायाचित्र.....

म्हसवड  – माणदेशी फाउंडेशन आणि बजाज कंपनीच्या सहकार्याने 1 जानेवारीपासून म्हसवड येथे राज्यातील पहिली जनावरांची चारा छावणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा व महिला बॅंकेच्या चेअरमन चेतना सिन्हा यांनी दिली.

यंदा पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. शासनाने राज्यातील 151 तालुके व 254 मंडले दुष्काळी जाहीर केले आहेत. माण तालुक्‍यातही पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्‍यामधील सर्वच तलाव ऐन पावसाळ्यातही कोरडेच राहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खरीपासह या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याच न झाल्यामुळे जनावरांना चारा व पाणी टंचाई समस्येचे संकट आहे. चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीस काढू नये, यासाठी बजाज कंपनीच्या सहकार्याने माणदेशी फाउंडेशन येथील मेगा सिटीत छावणी छावणी सुरू करत आहे. म्हसवड परिसरातील शेतकऱ्यांनी चारा टंचाईने त्रस्त न होता छावणी जनावरे आणावीत, असे आवाहन श्रीमती सिन्हा यांनी केले.

आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्डची झेरॉक्‍स (यापैकी एक), पशुवैद्यकीय अधिकारी यांचा जनावरे असल्याबाबतचा दाखला, शेतकऱ्याचे दोन छायाचित्रे तसेच शेतीचा सात-बारा उतारा ही कागदपत्रे आवश्‍यक असून याशिवाय चारा छावणीमध्ये प्रवेश मिळणार नाही. अधिक माहितीसाठी माणदेशी फौंडेशन म्हसवड येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)