#Video : साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीची निदर्शने 

सातारा – सातारा शहरात विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सातारा शहराच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यातील इतर मंत्र्याच्या उपस्थित सैनिक स्कूलच्या मैदानवर कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी मैदानाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अचानक त्यांच्या पक्षाचे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

मुख्यमंत्री दहा हजार कोटीच्या कामाचे करत असलेले उद्घाटन म्हणजे सातारा जिल्ह्यातील जनतेची फसवणुक असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाजर फेको आंदोलन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी सातारा शहरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी तात्काळ निदर्शने करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्यात नेले.

साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीची निदर्शने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यातील इतर मंत्र्याच्या उपस्थित सैनिक स्कूलच्या मैदानवर कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी मैदानाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अचानक त्यांच्या पक्षाचे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी सातारा शहरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी तात्काळ निदर्शने करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Posted by Dainik Prabhat on Sunday, 23 December 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)