कामाला लागा….

-मधुसूदन पतकी

देशातील धुरंधर राजकीय व्यक्तीमत्व म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ओळख आहे.त्यांचे राजकारण कोणाला कळत नाही. त्यांची भाषा जी असते ती नसते.ते विचार करतात ते करत नाहीत आणि ज्याचा विचार केला जात नाही ती चाल ते सहज चालतात.आपल्या पक्षात विरोधकांना स्थान देताना विरोधी पक्षात आपली माणसे पेरून ठेवण्यात त्यांचा हातखंडा आहे.ते सगळ्यांच्या जवळचे आहेत.मात्र त्यांच्या जवळ कोणी नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माणसात वावरणारे पण स्वयंभू,स्वतंत्र आणि स्वकेंद्री असणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख विविध पैलुतून होत असते.असे असताना त्यांच्या स्वभावाचा थांग लागत नाही आणि तो ते लागू देत नाहीत.बारामतीत निम्म बोलताना उरलेले अगदी त्याच्या भिन्न प्रकृती नि विचारांचे वक्तव्य ते पाटण येथे करतात. त्यामूळे नक्की ते आहेत कोणा कडून आणि विरोधात कोणाच्या हे कामाला लागा अशा आदेशाची वाट पहाणाऱ्या कार्यकर्त्यांना काही समजायला तयार नाही.

या आठवड्याच्या प्रारंभीच शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे मेळावा घेऊन आडवे तिडवे भाषण ठोकले. हे भाषण कोणाला समजले त्यांनी मनसेचे कार्यकर्ते देशपांडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. भाषण समजावून दिले तर 151 रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.तेंव्हा आठवड्याच्या प्रारंभीच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने तोफ डागली आहे.

याचे पडसाद संपूर्ण आठवडाभर उमटत रहातील यात शंका नाही.त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सातारा येथे जी फलंदाजी केली आणि खा.उदयनराजे भोसले यांनी जी गोलंदाजी केली त्यामूळे राष्ट्रवादीत काही ना काही खळबळ नक्कीच निर्माण झाली आहे.भारतीय जनता पक्ष राजेंची दिल्लीला जाणारी वाट प्रशस्त करणार असल्याने खा.उदयनराजे भोसले यांना निवडणुकीची राष्ट्रवादीची बिकट वाट पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा धोपट मार्ग पाहिजे हे ठरवण्याची संधी आहे.

त्यातच साताऱ्यात मनोमिलना रस्ता त्या समारंभात खड्ड्यांचा रहाणार की खड्डेमुक्त हे पण नक्की होईल.हे सगळे लिहायचे कारण म्हणजे,पक्ष कोणताही असो, उमेदवार कोणी ही असो सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक शरद पवार यांच्या भोवती फिरत रहाणार हे नक्की झाले आहे.पाटण येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी, आम्ही त्यांचे काय करायचे ते पाहून घेऊ असे सांगून सर्व मार्ग मोकळे ठेवले आहेत.

दुसऱ्या बाजुला कोल्हापूरात डी.वाय.पाटील यांना पक्षात घेऊन घरात दोन भाग केले.त्यातून अजिंक्‍य डी.वाय.पाटील यांनी शिवसेनेतून आपले नशिब आजमावून पाहिले होते. त्यामूळे पाटीलांच्या घरात आता भारतीय जनता पक्ष तेवढा शिल्लक राहीला. मात्र कोल्हापूरातही श्री.पवार यांनी नेते , कार्यकर्ते यांच्यात चांगलाच बुध्दीभेद केला.

महाडिक विरुध्द पाटील ही दोन टोके एकत्र आणायची की स्पर्धात्मक दृष्ट्या अजून लांब नेण्याचा त्यांच विचार आहे , हे नेहमी प्रमाणे त्यांचे त्यांनाच माहिती असेल. एकमात्र खरे , पश्‍चिम महाराष्ट्रातच राष्ट्रवदीचा प्रभाव आहे आणि याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या शक्तीप्रदर्शनाला अगदी आश्‍चर्यकारक पध्दतीने सादर केले आहे. कार्यकर्त्यांना कामाला लागा असे सांगताना , कामाला लावा असे अद्यारत असेल तर आत प्रश्‍न एकच रहातो कामाला लावायचे कोणाला ?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)