व्यापाऱ्यांनी डिजीटल सेवेचा लाभ घ्यावा : कुंभारदरे

महाबळेश्‍वर  – दि महाबळेश्‍वर अर्बन बॅंकेच्या प्रगतीमध्ये येथील व्यापारी वर्गाचे मोलाचे योगदान आहे हे लक्षात घेवून व्यापारी यांच्या मागणीनुसार बॅंकेने अनेक डिजीटल सेवा सुरू केल्या असून व्यापाऱ्यांनी या सर्व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अर्बन बॅकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे यांनी येथे बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर बॅंकेचे उपाध्यक्ष सी. डी. बावळेकर व मुख्य व्यवस्थापक उमेश बगाडे हे उपस्थित होते.

अर्बन बॅंकेच्यावतीने बॅकेच्या सभागृहात व्यापारी सहविचार बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत व्यापारीवर्गास मार्गदर्शन करताना बॅंकेचे अध्यक्ष कुंभारदरे हे बोलत होते. शहरात आता नव्याने खाजगी बॅंकांचे आगमन होत आहे. खाजगी बॅंकांप्रमाणेच अर्बन बॅंक डिजीटल सेवा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नात बॅंकेला व्यापारी वर्गाची साथ हवी आहे, अशी साद घालून कुंभारदरे यांनी बॅंकांनी व्यापारी वर्गासाठी सुरू केलेल्या ठेव कर्ज व बॅकिंग सुविधा व सेवांची माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी नगरसेवक रमेश शिंदे, जावेद शेख, प्रमोद गोंदकर, ऍड. संजय जंगम, आशिष नायडु, अभिजीत खुरासणे यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष सी. डी. बावळेकर यांनी आभार मानले. यावेळी माजी अध्यक्ष दत्ताजी वाडकर, वृषाली डोईफोडे, बाळासाहेब कोंढाळकर, विद्यमान संचालक दिलीप रिंगे, समिर सुतार, सचिन धोत्रे, नंदकुमार वायदंडे, जावेद वलगे, इरफान शेख यांच्यासह व्यवस्थापक उमेश बगाडे, शाखा व्यवस्थापक बाळकृष्ण साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)