बॅंकांच्या संपामुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत

प्रातिनिधिक छायाचित्र

सातारा  – सरकारी बॅंक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे बुधवारी बॅंकांचे कामकाज विस्कळीत झाले होते. साताऱ्यातील बॅंका संपात सहभागी झाल्याने ग्रहकांचे हाल झाले.

आजच्या संपामध्ये सर्व सरकारी बॅंकांमधील, जुन्या खासगी क्षेत्रातील तसेच काही विदेशी बॅंकांमधील सुमारे 10 लाख कर्मचारी सहभागी झाले होते. या एकदिवसाचा संप “युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन’ या नऊ संघटनांच्या महासंघाच्यावतीने पुकारण्यात आला होता. मात्र या संपामध्ये खासगी बॅंका झाल्या नव्हत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजया बॅंक आणि देना बॅंकेचे विलीनीकरण बॅंक ऑफ बडोदामध्ये करण्याच्या प्रस्तावाविरोधात हा संप पुकारण्यात आला होता. हे विलिनीकरण बॅंकांच्या किंवा ग्राहकांच्या हिताचे नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारने या प्रस्तावित विलीनीकरणाची घोषणा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)