शॉर्टसर्किटमुळे लक्ष्मीणारायण अपार्टमेंटला आग

सातारा ः लक्ष्मीनारायण अपार्टमेंटला लागलेली आग.

जीवित हानी नाही

सातारा – दत्तात्रय घाडगे यांच्या सातारा माची पेठेतील लक्ष्मीनारायण अपार्टमेंट येथे आग लागली.या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही . सातारा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाची गाडी वेळेत आल्याने मोठा अनर्थ टळला.आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपार्टमेंट मध्ये 11 फ्लॅट असून किमान 50 लोक राहत आहेत. पावणे सहाच्या सुमारास धुराचे लोट घराबाहेर आल्याचे रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी पाहिले. यावेळी नागरिकांनी एकच गलका केला.

सर्वत्र धावपळ सुरू झाल्याने घाबराट निर्माण झाली. यावेळी आग आटोक्‍यात आणण्यासाठी ए.के. पाटील, अभिजित शिंदे, नगरसेवक अमोल मोहिते, गणेश शिंदे, संभाजी चौगुले, उमेश दाभाडे, आणि लक्ष्मी नारायण सोसायटीच्या सदस्यांनी प्रयत्न केले. या ठिकणी मूळ मालक राहत नसून भाडेकरी राहत होते. ते घरी नसताना ही दुर्घटना घडली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)