सलतेवाडी येथे दत्तजयंती दत्तजयंतीनिमित्त वृक्षारोपण

सलतेवाडी : दत्तजयंतीनिमित्त वृक्षारोपण करताना अशोक मोरे, दत्तू मत्रे व इतर.

काळगाव – सळतेवाडी ता. पाटण येथे दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराफच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांची उधळण करत दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सलतेवाडी येथील वाडीचे ग्रामदैवत असलेल्या श्री दत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात मंदिरावर पूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच काकड आरती, अभंगवाणी, पारायण सोहळा, प्रवचन, किर्तन, हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे ग्रामस्थांकडून आयोजन करण्यात आले होते.

शनिवारी दत्त जयंती सोहळा, रविवारी ह. भ. प. विजय महाराज मालनद यांचे दत्त जन्मावर काल्याचे किर्तन झाले. उत्सव काळात श्री दत्तजयंती उत्सव मंडळ व ग्रामस्थ मंडळ सलतेवाडी यांच्याकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान व वृक्षारोपण करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृक्षारोपण कार्यक्रमास वाझोलीचे सरपंच अशोक मोरे व मत्रेवाडीचे सरपंच दत्तू मत्रे उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबिर व नेत्रतपासणी शिबिराचे उद्‌घाटन पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी जया चाळके यांची प्रमुख उपस्थिती होती तर सुनंदा सलते या अध्यक्षस्थानी होत्या. त्याचबरोबरच मुलांना शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)