खोडद फाटा येथे चोरी

नागठाणे – खोडद फाटा (ता. सातारा) येथे रासायनिक खताचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद सुरेश शिवाजी बिडे (रा. खोडद, ता. सातारा) यांनी सोमवारी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खोडद फाटा येथे वैभव ऍग्रो सर्व्हिस नावाचे रासायनिक औषध विक्रीचे दुकान आहे. गेल्या मंगळवारी सकाळी सुरेश बिडे हे दुकान बंद करून गेले. गुरुवारी सकाळी त्यांच्या पत्नी दुकानाकडे गेल्या असता मागच्या बाजूला पत्रा उचकटून तोडलेला आढळला. त्यांनी दुकान खोलून पाहिले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.याची माहिती त्यांनी पती सुरेश बिडे यांना फोनवर दिली. त्यांनी दुकानात येऊन पाहिल्यावर अज्ञात चोरट्याने दुकानाचा मागचा पत्रा उचकटून शेतीउपयोगी असणारी सुमारे साठ हजार रुपये किमतीची औषधे चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमवारी दुपारी सुरेश बिडे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास हवालदार सुनील पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)