देशरक्षणासाठी हिंदूच पुढाकार घेतील

सातारा - हिंदु राष्ट्र जागृती सभेस उपस्थित जनसमुदाय.

संजीव पुनाळेकर : शिरवळ येथे हिंदू राष्ट्र-जागृती सभा

शिरवळ – हिंदूंच्या प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे. शस्त्रपूजन हा हिंदूंचा अधिकार आहे. आज देश अराजकाच्या आणि गृहयुद्धाच्या दिशेने चालला आहे. जेव्हा अराजक माजेल, तेव्हा देशरक्षणासाठी हिंदूच पुढाकार घेतील आणि या देशाला हिंदु राष्ट्र बनवतील. बलशाली मनगट आणि कणखर ह्रदय असणारे साधक आणि संन्यासी योद्धेच करू शकतील, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

23 डिसेंबरला ज्ञानसंवर्धिनी शाळेच्या मैदानात हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या यशस्वी लढ्याविषयी सर्वांना अवगत केले. या विराट सभेला सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाड्ये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनीही संबोधित केले.

येवली, पळशी, भांबवडे, कापूरहोळ, विंग, मोर्वे, खानापूर, आळंदेवाडी अशा जवळपासच्या 100 हून अधिक गावांमधून प्रसार करण्यात आला होता. 4 सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. शंखनाद आणि दीपप्रज्वलनाने सभेला प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवर वक्त्‌यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर झालेल्या वेदमंत्रपठणाने सभास्थळी चैतन्य निर्माण झाले. या सभेच्या निमित्ताने सनातनचा नूतन ग्रंथ “मुंडू (लुंगीसारखे वस्त्र) यापेक्षा धोतर अधिक श्रेष्ठ’ याचे प्रकाशन अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या हस्ते, तसेच वर्ष 2019 च्या सनातन पंचांगाचे आय. ओ. एस. प्रणालीचे प्रकाशन स्वाती खाडये यांच्या हस्ते करण्यात आले.

मालेगाव स्फोट प्रकरणात जामिनावर सुटलेले समीर कुलकर्णी, तसेच हिंदुत्वनिष्ठांची न्यायालयात बाजू परखडपणे मांडणारे अधिवक्ता धर्मराज चंडेल यांचा स्वाती खाडये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवर वक्त्‌यांची भाषणे झाली.

हिंदु राष्ट्राचा उद्घोष करत असल्यानेच सनातन संस्थेची मुस्कटदाबी केली जात आहे; मात्र “कोंबडा कितीही झाकला, तरी सूर्य उगवतोच’ हे धर्मविरोधकांनी लक्षात घ्यावे’, असे स्वाती खाडये यांनी सांगितले, हिंदु धर्मावर होणाऱ्या आघातांच्या विरोधात जात-पात-संप्रदाय, गटतट विसरून हिंदूंनी कृतीशील होणे आवश्‍यक आहे,असे आवाहन सुनील घनवट यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)