मधुकर खरे यांना राज्यस्तरीय गुंफण आदर्श पत्रकार पुरस्कार

सातारा -बेळगाव जिल्ह्यातील कावळेवाडी येथे होत असलेल्या 16 व्या गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने मसूर (जि. सातारा) येथील साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या गुंफण अकादमीच्यावतीने गुंफण साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, सद्‌भावना व पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारांच्या मानकऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील पत्रकार मधुकर खरे यांना राज्यस्तरीय गुंफण आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्‍वर चेणगे व उपाध्यक्ष बबन पोतदार यांनी दिली.

गुंफण राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारासाठी निवड झालेले सातारा जिल्ह्यातील पत्रकार मधुकर खरे हे मागील 20 वर्षांपासून निर्भीड पत्रकारिता करीत आहेत. त्यांना याआधी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार, राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पत्रकार मधुकर खरे यांचे व्यतिरिक्त गुंफण साहित्य पुरस्कारासाठी, पणजी गोवा येथील प्राचार्य रामदास केळकर यांची, गुंफण सदभावना पुरस्कारासाठी पुणे येथील कवियत्री जयश्री घुले यांची, गुंफण सांस्कृतिक पुरस्कारासाठी बेळगाव येथील दादासाहेब चौगुले, गुंफण सामाजिक पुरस्कारासाठी सोलापूर येथील महेंद्रकुमार बाजारे यांच्या निवडीची घोषणा ही यावेळी करण्यात
आली.

रविवार, 10 फेब्रुवारी रोजी कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे होणाऱ्या गुंफण सद्‌भावना साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)