मनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र

-पवारांनी दोघांसह आ. शिंदेंना आणले एकत्र
-मॅरेथॉनच्या निमित्ताने मनोमिलनाचे संकेत

सातारा – यंदाचा प्रजासत्ताक दिन जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींनी गाजला. सातारा दौऱ्यावर आलेले खा.शरद पवार यांनी आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे यांच्यासह आ.शिंदे यांना एकाच गाडीत बसविले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी हिल मॅरेथॉनच्या कार्यक्रमात दोन्ही राजेंनी विजयाची खूण दाखवून मनोलिनावर शिक्कामोर्तब झाल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले.

सातारा नगर पालिकेच्या निवडणुकीपासून संघर्ष निर्माण झालेले दोन्ही राजे प्रजासत्ताक दिनी पुन्हा एकत्र आले. मात्र, यावेळी त्यांच्या एकत्र येण्याला राजकीय किनार होती. कारण, शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हेलिकॉप्टरने साताऱ्यात आले.

आता पळायची हौसच फिटलीय

हिल मॅरेथॉनच्या निमित्ताने दोन्ही राजे उपस्थित राहिले. यावेळी खा.उदयनराजेंनी संयोजकांना उद्देशून टोलेबाजी केली. तुम्ही इतके पळवलय की आता आम्हा दोघांची पळायची हौसच फीटलीय, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढील कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वाहनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र,पवार यांचे हेलीपॅडवर स्वागत  झाल्यानंतर त्यांनी उपस्थित खासदार उदयनराजे भोसलेंना बोलावले व ह्या गाडीत बसा असे सांगितले. पुढे कार्यक्रमस्थळी पवारांसोबत शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे आणि आमदार शशिकांत शिंदे हे एकाच गाडीतून आल्याने उपस्थितांमध्ये पवारांनी मनोमिलन केले, या चर्चेला सुरूवात झाली.

त्यानंतर सायकांळी साताऱ्यातील एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पुन्हा दोन राजे एकाच व्यासपिठावर आले. तर दुसऱ्या दिवशी रविवारी हिल मॅरेथॉनच्या निमित्ताने एकत्र आले. मात्र, यावेळी दोघांनी छायाचित्रकारांना प्रसन्न मुद्रेत विजयाची खूण दाखवून मनोलिनाच्या चर्चेचा जोर आणखी वाढवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)