साताऱ्यातून सेनेचाच उमेदवार लढणार आणि जिंकणार – उध्दव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी दिला पदाधिकाऱ्यांना विश्वास

सातारा – भाजप व सेनेची युती झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदार संघ कोणाच्या वाट्याला येणार, या प्रश्नाचे उत्तर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मागील निवडणुकीत सातारा रिपाइंला सोडण्यात आला असला तरी येत्या निवडणुकीत सेनेचाच उमेदवार लढेल आणि जिंकेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वास दिला.

शनिवारी ‘मातोश्री’ येथे सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत साताऱ्याच्या जागेवरून विचारमंथन झाले. तसेच यावेळी भाजपकडून ना.नरेंद्र पाटील यांची तयारी सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, तूर्त अशा बाबींकडे दुर्लक्ष करा व सेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असा स्पष्ट आदेश पदाधिकाऱ्यांना दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)