भारतीय जनसंसदेचे कोरेगावात आंदोलन

कोरेगाव – कोरेगाव तहसील कार्यालयातील कारभार सुधारण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी भारतीय जनसंसदेतर्फे तहसील कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात आले.

तहसील कार्यालयातील बेकायदेशीर सेतू बंद करावा, विभक्त शिधापत्रिका वाटप त्वरित सुरु करावे, अभिलेख कक्षातील कामकाज सुरळीत करावे आणि शेतकऱ्यांना ऑनलाईन 7/12 उतारा बिनचूक मिळावा आदी मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष संजय माने यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रमेश माने, सुरेश येवले, शहराध्यक्ष प्रशांत गुरव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनआंदोलन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)