कोरेगाव विषय समिती सभापतिपदाच्या निवडी बिनविरोध

दोन्ही कॉंग्रेसची आघाडी; प्रत्येकी दोन सभापतिपदे

कोरेगाव – कोरेगाव नगरपंचायतीत आघाडी धर्माचे पालन करत राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय कॉंग्रेस एकत्रित आल्या असून, त्यांनी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांना बाजूला ठेवत सभापती निवडी बिनविरोध केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन तर कॉंग्रेसला दोन सभापतिपदे देण्यात आली आहेत. अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार सौ. स्मिता पवार यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरेगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे 9 तर कॉंग्रेसचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही कॉंग्रेसला प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवकपद मिळाले आहे. निवडणुकीनंतर काही महिन्यातच राष्ट्रवादीमध्ये बेबनाव झाला आणि नगराध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारात निर्णय घेण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी अंतर्गत धुसफूस असल्याने आ. शशिकांत शिंदे यांच्यापुढे देखील प्रश्‍न होता. अखेरीस विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवड लक्षात घेऊन गेल्या महिन्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. आ. शशिकांत शिंदे व आ. जयकुमार गोरे यांच्यामध्ये बैठक होऊन राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय कॉंग्रेस एकत्रित आल्या. 12 विरुध्द 5 अशा पध्दतीने सभापती निवडीला सामोरे जाण्याचे ठरले होते.

बुधवारी सकाळी अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार सौ. स्मिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीसाठी नगरसेवकांची बैठक सुरु झाली. त्यामध्ये स्थायी समितीचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांची निवड कायम झाली. अन्य सभापतींमध्ये उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांनी पाणी पुरवठा समितीचे सभापती, संजय पिसाळ यांची नियोजन समितीचे सभापती, नितीन उर्फ बधूशेठ ओसवाल यांची बांधकाम समितीचे सभापती तर सौ. पूनम मेरुकर यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

सभापती निवडीच्या कामकाजामध्ये तहसीलदार सौ. पवार यांना मुख्याधिकारी सौ. पूनम कदम-शिंदे, मंडल अधिकारी किशोर धुमाळ, तलाठी शंकरराव काटकर, कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब सावंत यांनी सहकार्य केले.

राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय कॉंग्रेस एकत्रित

कोरेगाव नगरपंचायतीत दोन्ही कॉंग्रेस एकत्रित येण्यात पडामागे मोठ्या वेगवान घडामोडी घडल्या आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये होणारी नगराध्यक्ष निवड हा त्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आ. शशिकांत शिंदे व आ. जयकुमार गोरे यांच्यामध्ये बैठक होऊन आघाडीचा निर्णय घेण्यात आला. आ. गोरे यांचे निकटवर्तीय मित्र किरण बर्गे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दोन्ही कॉंग्रेसचे संख्याबळ आता 12 वर जाऊन पोहोचले आहे. दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीमुळे आता राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन तर कॉंग्रेसला दोन सभापतिपदे आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)