दुष्काळी पट्यातील जनावरांसाठी ‘शिवम’ पाठवणार चारा

संग्रहित छायाचित्र

कराड – दुष्काळी विदर्भ-मराठवाड्यातील मुक्‍या जनावरांचे चाऱ्याविना हाल होवू नयेत या उद्दात हेतूने घारेवाडी (ता. कराड) येथील शिवम प्रतिष्ठानच्यावतीने प्रमुख मार्गदर्शक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळग्रस्त भागातील जनावारांना येथून पाच ट्रक चारा पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी समाजातील दानशुरांनी शिवमच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे विश्वस्त संजय पाटील यांनी केले आहे.

शिवम प्रतिष्ठानच्यावतीने प्रमुख मार्गदर्शक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. दुष्काळी भागातील बांधवांसाठी, तेथील जनावरांसाठी प्राधान्याने काहीतरी करण्याच्या हेतूने देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवमच्या साधकांनी बुलढाणा जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन तेथे श्रमदानाची कामे केली होती. त्याचबरोबर यंदाही तो उपक्रम राबवण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनी त्या कालवधित दुष्काळी पट्यातील जनावरांचे काय हाल होतात हे डोळ्याने पाहिले होते. त्याचबरोबर जनावरांना चारा-पाणी नसल्याने तेथून स्थलांतरीत होण्याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्या मुक्‍या जिवांना आधार मिळावा यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत यंदा चारा पाठवण्याची कार्यवाही शिवमच्यावतीने करण्यात येणार आहे. यंदा शिवमच्या माध्यमातून पाच ट्रक चारा दुष्काळी भागात पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरु आहे.

समाजातील दानशुरांनीही सामाजिक बांधिलकीतून शिवमने हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमास सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)