शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतला विद्यार्थ्यांचा पाठ

कडेगाव - विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. देवानंद शिंदे विद्यार्थ्यांना शिकवताना.

कडेगाव – शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयास अचानक भेट दिली व विद्यार्थ्यांशी वर्गात जावून संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड होते.

महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्गात, प्रयोगशाळेत तसेच ग्रंथालयात जावून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक विषयाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या विषयाशी निगडित प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांने निवडलेला विषय का निवडला आहे, त्या विषयातील चालू घडामोडी काय आहेत, तो विषय दैनंदिन जीवनाशी कसा निगडीत आहे, दैनंदिन जीवनातील समस्या कसे सोडविता येतील याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी प्राचार्या डॉ. सुलक्षणा कुलकर्णी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. गजानन माळी, एनएसएसच्या समन्वयक श्रीमती शीला मोहिते व प्रा. महेश माळी, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भिमराव मोहिते उपस्थित होते. विद्यार्थीनी व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)