विनयभंगप्रकरणी सासऱ्यास दीड वर्षाचा कारावास

शिरवळ – धनगरवाडी ता. खंडाळा येथील सुनेच्या विनयभंग प्रकरणी सासऱ्याला खंडाळा येथील प्रथमवर्ग न्यायधंडाधिकारी यांनी एक वर्षे सहा महिने कारावास व एक हजार रूपये दंड व दंडाची रक्कम न दिल्यास दहा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. संतू साधू काळे (रा. धनगरवाडी, ता. खंडाळा) असे त्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, संतू साधू काळे (रा. धनगरवाडी) यांची बकरी तेथीलच जमदाडे यांच्या शेतात बसण्यास होती. दि. 11 जुलै 2017 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पती बकरी तळावर नसताना सासरे संतू काळे यांनी दारू पिऊन येऊन बकऱ्यासमवेत असलेल्या त्यांच्या सुनेला शिवागाळ करीत मारहाण करून तिचा विनयभंग केला. यावेळी पळून जाऊन आपला बचाव केला होता. त्यानंतर सासू व पती समवेत जाऊन शिरवळ पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रकाश खरात यांनी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दोषारोप पत्र दाखले केले. त्यानुसार सरकारी वकील महेश यादव यांचा युक्तीवाद व पुरावे ग्राह्य मानत खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. गिरी यांनी संबधित विवाहितेचा म्हणजेच सुनेच्या विनयभंग प्रकरणी सासरे संतू काळे यांना दोषी ठरवत एक वर्षे सहा महिने कारावास व एक हजार रूपये दंड, दंडाची रक्कम न दिल्यास दहा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी प्रॉसीक्‍युसेशन स्कॉडचे पोलीस हवालदार रविंद्र कदम, सुनिल गायकवाड, सुरेश मोरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)