सातारा काॅंग्रेसचे अध्यक्ष भाजपात; माढ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता

सातारा : सातारा व माढा लोकसभा मतदार संघात गेल्या काही दिवसांमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शनिवारी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. सोमवारी संध्याकाळी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती सुत्रांनी  दिली.

सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. माढा मतदार संघात राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप उमेदवाराबाबत उत्कंठा लागून राहिली असतानाच शनिवारी फलटनमधील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली.  काही महिन्यांपूर्वीच त्यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात त्यांचा जंगी सत्कारही करण्यात आला होता. लोणंद येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेस बैठकीत निंबाळकर यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसला बळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र शनिवारी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. सोमवारी सायंकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भाजप प्रवेश केला जाणार आहे. त्यामुळे त्यांना माढा मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळणार का?  याबाबतच्या चर्चांना आता उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)