भारताच्या नकाशाची ग्लोबल रेकॉर्ड ऍण्ड रिसर्च फौंडेशनने घेतली नोंद

सातारा -राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने 25 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मैदानावर बाराशे शालेय विद्यार्थ्यांनी भरताच्या नकाशाच्या आकारात उभे राहून त्यामध्ये मतदान करा हा संदेश दिला. त्याची नोंद ग्लोबल रेकॉर्ड ऍण्ड रिसर्च फौंडेशनच्या चिल्ड्रेन रेकॉर्डमध्ये करण्यात आली आणि त्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना यावेळी प्रदन करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या पुढाकारातून जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय, नागठाणे यांच्या सहकार्याने केलेल्या या कार्यक्रमाची जागतिक नोंद चिल्ड्रेन रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. हा आगळावेगळा उपक्रम केल्याबद्दल लोकांकडून अतिशय उत्तम प्रतिक्रिया येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)