भीषण अपघातात कंडक्‍टरचा मृत्यू

भुईंज -ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर सुरुर गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत वाई आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेला अतुल भोसले हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात शनिवार, 26 रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला.

अधिक माहिती अशी, अतुल तुकाराम भोसले (वय 27, रा. वरचे चाहुर, भुईंज) हा युवक शनिवार, 26 रोजी दुचाकीवरुन भुईंजकडून सुरुरच्या दिशेने निघाला होता. अतुल सुरुरच्या गावच्या हद्दीत आला असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने अतुलच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत अतुलचा जागीच मृत्यू
झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपघताची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार बाबर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)