#व्हिडीओ : कराड येथे नदीपात्रात उतरून शासनाचा निषेध

पंचायत समिती सदस्य संघर्ष समिती आक्रमक

कराड :पंचायत समित्या या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींमधील दुवा आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्था निर्माण करून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना दिली. तसेच सत्तेचे विकेंद्रीकरण केले. मात्र, सध्याचे सरकार ही व्यवस्था मोडीत काढायला निघाले आहे. खरे तर ही व्यवस्था टिकली पाहिजे. पंचायत समितीला ठोस अधिकार आणि निधी मिळायला पाहिजे. यासाठी राज्यभरातील सर्वपक्षीय पंचायत समिती सदस्यांचे येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होते. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने सर्व सदस्यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता नदीपात्रात उतरून शासनाच्या निषेधार्थ आंदोलन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड कृष्णाकाठावर आल्यानंतर आंदोलकांनी पाण्यातून बाहेर येत आंदोलन थांबविले. आंदोलनाची दखल न घेतल्याने सदस्यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला.

या आंदोलनात पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती आणि सदस्य सहभागी झाले होते. यात महिला सदस्यांचाही लक्षणीय सहभाग होता. तसेच गेल्या तीन दिवसात यवतमाळ नागपूर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग नोंदवला.

कराड येथे नदीपात्रात उतरून शासनाचा निषेध …

कराड : पंचायत समितीला ठोस अधिकार आणि निधी मिळायला पाहिजे. यासाठी राज्यभरातील सर्वपक्षीय पंचायत समिती सदस्यांचे येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होते. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने सर्व सदस्यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता नदीपात्रात उतरून शासनाच्या निषेधार्थ आंदोलन केले….सविस्तर बातमीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा… https://goo.gl/EPwrqT

Posted by Dainik Prabhat on Friday, 25 January 2019

पंचायतराज व्यवस्था टिकलीच पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)