पर्यावरण प्रेमींकडून वटवृक्षाला श्रध्दांजली

अपार्टमेंटच्या बांधकामाला अडथळा आल्याने वटवृक्षाची कत्तल

ठोसेघर – सातारा समर्थ मंदिर-बोगदा मार्गावर असणारा एक महाकाय वटवृक्ष नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता शुक्रवारी तोडण्यात आला.एका अपार्टमेंटच्या बांधकामाला अडथळा निर्माण होत असल्याने हा वटवृक्ष तोडण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. त्याच अनुषंगाने पर्यावरण प्रेमींकडून रविवारी सकाळी बेकायदेशीररीत्या वृक्षतोड झालेल्या ठिकाणी त्या वृक्षाला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्याच आठवड्यात वृक्ष कमिटीच्या मिटिंगमध्ये आरटीओ ऑफिसमधील वृक्षतोडी मागील आर्थिक लागेबांध्यांची चांगली चर्चा सातारकरांना अनुभवायला मिळाली. सातारा शहराच्या परिसरात राजरोसपणे अशाच प्रकारे बेकायदेशीरित्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे नगरपालिकेचा वृक्ष विभाग व काही लोक संगनमत करून शहरातील अनेक झाडांची कत्तल करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. सध्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली जागोजागी झाडांच्या कत्तल करण्याचे प्रमाण वाढले आहे. वनमंत्र्यांनी 13 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना अशाप्रकारे बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याने या योजनांना हरताळ फासण्यात शासकीय यंत्रणातीलच काही लोक जबाबदार असल्याने अशा योजनांचा फज्जा उडाला आहे.

प्रत्येक करदात्याच्या खिशातून वृक्ष कर शासनामार्फत वसूल केला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जागरूकता दाखवत अशाप्रकारे बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्यास आवाज उठविण्याचे आवाहन यावेळी सामान्य नागरिकांना उपस्थितांच्या मार्फत करण्यात आले. त्याचबरोबर बेकायदेशीर वटवृक्षाची कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे, नितीन पवार, अमित शिंदे, हरिभाऊ शिरसाट, वैशाली दुबळे व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)