सातारा : बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्याचे भाग्य उजळले

संग्रहित छायाचित्र

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नातून 50 लाखाचा निधी; पूलही होणार

सातारा – सातारा शहरातील बुधवार नाका, कब्रस्तान ते मोळाचा ओढा या रस्त्याची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्याचे काम मार्गी लागावे आणि नागरिकांची गैरसोय थांबावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या रस्त्याच्या कामासाठी तब्बल 50 लाख रुपये निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करुन घेतला असून लवकरच या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, याच रस्त्यावरील शाहूपुरी पोलीस ठाण्याशेजारील अरुंद पूलाचेही रुंदीरकरण या निधीतून होणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा शहर आणि शाहुपूरी (त्रिशंकू भाग) याचा काही भाग असलेल्या या रस्त्याच्या कामास निधी नेहमीच तोडका पडत असे. या रस्त्याचे काम आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यापुर्वीही मार्गी लावले होते.

मात्र निधी तोकडा पडत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण, पुलाचे रुंदीकरण होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे हे काम मार्गी लावण्यासाठी भरीव निधी मिळणे आवश्‍यक होते. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीकडे या रस्त्यासाठी निधी मिळण्याची मागणी करुन यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले असून बुधवार नाका ते मोळाचा ओढा या रस्त्यासाठी जिल्ह वार्षीक नियोजन 3054 (ग्रामीण मार्ग विकास व मजबुतीकरण) या योजनेतून तब्बल 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

मंजूर निधीतून सातारा शहर पोहोच रस्ता ग्रामीण मार्ग 62 या रस्त्यावरील बुधवार नाका ते मोळाचा ओढा या रस्त्यावरील खड्डे भरण्याबरोबरच एम.पी.एम. कारपेट, सिलकोट, बाजूपट्टी व गटर करणे ही कामे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याशेजारील पुलाचे रुंदीकरण करणे हे महत्वाचे काम केले जाणार आहे. तातडीने निविदा प्रक्रीया राबवून या रस्त्याच्या कामास लवकर प्रारंभ करा आणि काम दर्जेदार करा, अशा सक्‍त सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

दरम्यान, या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने सातारा, शाहुपूरी आणि मोळाचा ओढा मार्गे शहरात येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)