सैदापुरात बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

सातारा – सैदापूर ता. सातारा येथे बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भिमसेन कोंडीबा वांगडे (रा.साईदर्शन कॉलनी, सैदापूर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वांगडे हे दि. 25 रोजी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर ते दि.27 रोजी घरी परत आले तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला त्यांनी दिसला. त्यांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी घरातील वस्तूची पाहणी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यावेळी घरातील एलसीडी, संगणक, सोने, चांदीचे दागिणे असा 54 हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)