सासवडला “वॉटर कप’ जलरत्नांचा गौरव 

गाव पाणीदार करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानाने गावकरी हरखले 

सासवड: पुरंदर तालुक्‍यातील 69 गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला होता, त्यापैकी 23 गावांनी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण पूर्ण केले व हीच गावे स्पर्धेमध्ये पात्र ठरली. प्रत्यक्षात स्पर्धा कालावधीत पानवडी, सुकलवाडी, उदाचीवाडी, पोखर, तक्रारवाडी, वाघापूर, बेलसर, गराडे, थोपटेवाडी, मांढर, बोराळवाडी, आंबळे, कोळविहिरे या गावांनी जलसंधारणाची कामे केली. दि.8 एप्रिल ते 22 मे या 45 दिवसाच्या कालावधीत गावागावातील गट-तट विसरून गावकरी एकत्र आल्याने जलसंधारणासोबतच मनसंधारणही झाले.

-Ads-

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गौरव जलरत्नांचा हा तालुकास्तरीय कार्यक्रम सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात झाला. याप्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील भूमिपुत्र, पत्रकार, गावे, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, जलमित्र, संस्था, उद्योगसमूह इत्यादींचा पानी फाउंडेशन च्या वतीने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी दैनिक प्रभातचे पत्रकार निलेश जगताप व चंद्रकांत चौडकर, शशांक सावंत यांचा उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पानी फाऊंडेशनच्या वतीने गाव पाणीदार करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाल्याने गावकरीही हरखून गेले.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्‍यांचा वॉटर कप स्पर्धेत सहभाग असून स्पर्धा कालावधीत यंत्रांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे पुरंदर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. स्पर्धा कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या उदाचीवाडी, तक्रारवाडी,पानवडी, वाघापूर, सुकलवाडी, पोखर या गावांची प्राथमिक तपासणी पूर्ण झालेले असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. या कार्यक्रमास डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, सभापती अतुल म्हस्के, नितीन घोरपडे आदी उपस्थित होते. आंबादास बांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर आबा लाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)