सरफरोश-2 मध्ये काम करण्यास उत्सुक : जाॅन अब्राहम

आमिर खानचा सरफरोशच्या सीक्वेलमध्ये अभिनेता जाॅन अब्राहमच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. खुद्द जाॅन यानेच याबाबत स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की, मी या अॅक्शन चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक आहे. हा चित्रपट मुळच्या सरफरोश चित्रपटापेक्षा वेगळा असणार आहे.

दिर्ग्दशक जाॅन मॅथ्यू यांनी सरफरोशचे दिर्ग्दशन केले होते. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अामीर खान, सोनाली बेंद्रे, नसीरूद्दीन शहा महत्वपूर्ण भूमिकेत होते. यामध्ये आमीरने एसीपी राठोड ही भूमिका साकारली होती. हत्यारांची तस्करी  करीत असलेल्या आंतकवादी विरोधात लढत असलेला एक पोलीस अधिकारी अशी आमीरची भूमिका होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका मुलाखतीदरम्यान जाॅन अब्राहम म्हणाला की, मी आणि जाॅन मॅथ्यू या चित्रपटाची सहनिर्मिती करणार आहोत. आम्ही सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहोत. आम्ही हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचा प्लॅन करत आहोत.

पुढे बोलताना तो म्हणाला की, मी अामिर खानचा मोठा चाहता आहे. माझ्यासाठी या चित्रपटात काम करणे चॅलेंज असणार आहे. पण ही एक वेगळी कथा आहे आणि कथानक सुध्दा वेगळे आहे. पण थीम मूळ चित्रपटासारखीच आहे, या चित्रपटात काम करण्यास मी खुपच उत्सुक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)