टॉंटन – ऑस्ट्रेलियाविरूध्दची निराशाजनक कामगिरीची मालिका खंडित करण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना खडतर परिक्षेस सामोरे जावे लागणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज येथे होणाऱ्या या लढतीत चुरशीची अपेक्षा आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने इंग्लंड संघावर सनसनाटी विजय मिळविला आहे. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सामन्याआधी सर्फराझ अहमदने जिंकण्याची आम्हाला देखील संधी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंडवरील विजयामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. या सामन्यात सर्वच आघाड्यांवर आमची कामगिरी चांगली झाली होती. त्यातच ऑस्ट्रेलियाविरूध्द मिळविता येतो हे भारतीय खेळाडूंनी दाखवून दिले आहे. या लढतीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. आम्हालाही तसाच लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू पुन्हा विजयपथावर येण्यासाठी कसोशीने प्रयत्न करील हे लक्षात घेता आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद याने सांगितले.