सर्फराज अहमदला वर्णभेदी टिप्पणी भोवली; आयसीसीकडून झाली ‘ही’ शिक्षा

डर्बन – दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू अँडील फेलूकव्हायोवर वर्णभेदी टिप्पणी करणे पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदला महागात पडले आहे. याप्रकरणी आयसीसीने सर्फराज अहमदला दोषी ठरवत चार सामन्यासाठी निलंबित केले आहे. त्यामुळे सर्फराज अहमद मालिकेतील उर्वरित दोन एकदिवसीय सामने आणि दोन टी-20 सामने खेळू शकणार नाही.

सर्फराज अहमदने याप्रकरणी अँडील फेलूकव्हायो यांची माफी मागितली होती आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेन संघाने त्याला माफ देखील केले होते, पण आयसीसीने त्याला शिक्षा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. परंतु, या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमदने आफ्रिकेचा खेळाडू अँडील फेलूकव्हायोवर वर्णभेदी टिप्पणी केली. स्टम्प माईकमुळे हा प्रकार उघडकीस आला.

आयसीसीच्या 2012 मधील वर्णभेद विरोधी कायद्यानुसार खेळाडू, अम्पायर, संघांचा सपोर्ट स्टाफ, सामनाधिकारी यांना त्याचा धर्म, जात, देश, भाषा, रंग, संस्कृती किंवा त्यांचे जन्मस्थळ याबाबत त्याच्यावर टिप्पणी करणे, कृतीतून नाराजी व्यक्त करणे, त्यांना घाबरवणे हे आयसीसीच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)