साड्यांचे फॅशनेबल ड्रेसेस…

हातमागावर विणलेल्या कशिद्याच्या साड्या म्हणजे जीव की प्राण असतो प्रत्येकीचा, पण एकदा नेसलेली साडी वारंवार वापरण्याचा तोचतोचपणा दिसून येत नाही. साड्यांतील व्हरायटी न्याहाळताना जुन्या साड्यांचा उपयोग कुणाला देऊन टाकण्यापेक्षा वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस शिवून घेतले तर जुन्याला नवा टच अनुभवास मिळतो.

पण, हे शालूचं रूप आता ड्रेसच्या माध्यमातून पुढे येऊ लागलं आहे. याच जरतारीच्या शालूपासून केली जाणारी विविधांगी ड्रेसची निर्मिती आजच्या तरुणींना भुरळ घालणारी ठरू लागली आहे. साड्यांपासून ड्रेस तयार करून घेणे आजच्या तरुणींची एक फॅशन मानावी लागेल.

जुन्या साड्यांचे नवे उपयोग या निमित्ताने पाहायला मिळू लागले आहेत. साडयांपासून ड्रेसची निर्मिती ही कल्पना आज सण, समारंभात आपला ठसा उमटवून जाताना दिसतात. पारंपरिक साड्यांचा वेस्टर्न लूकही पाहायला मिळतो. नव्या डिझाईन, नव्या स्वरूपात, नव्या ढंगात साड्यांच्या रूपातील ड्रेसची नवी फॅशन आज तरुणींना भुरळ घालताना दिसून येते.

कोणतंही नवं डिझाईन असो किंवा असो एखादी कलाकुसर, ती आज फॅशनच्या रूपाने आपल्या समोर आली की, नवं म्हणून अंगिकारली जाते. मात्र जुनं मागे सारून नव्याचा वेध घेतला जातो. पण याच जुन्या-नव्याच्या चक्रामध्ये काही जुन्या गोष्टी परंपरा या आज नव्या रूपात, नव्या ढंगात फॅशन म्हणून पुढे आलेल्या दिसून येतात आणि आजची पिढी त्याचा हसतमुखाने स्वीकार करते, येथेच जुन्याचा नव्याने अंगिकार म्हणावा लागेल.

खराब म्हणून टाकून दिलेल्या वस्तूंचा वापरही नव्याने केला जाऊन ती फॅशन म्हणून अस्तित्वात येते, तेव्हा मानलं या फॅशनच्या दुनियेला म्हणून नकळतच नतमस्तक व्हावं लागतं. साडी, कुर्तीज, पर्स, बांगडया, हेअर कट्‌स आदींची विविध रूपं आज जुन्या-नव्याची सांगड घालताना दिसतात. एखादा सण-समारंभ असला तर जुनी फॅशन नव्या रंगात, नव्या ढंगात आपला ठसा उमटवून जाते. परंपरेला नवा टच दिलेली नवी झळाळी येथे आपणास पाहावयास मिळते.

आजच्या तरुण पिढीला जास्तीत जास्त दागिने, जड पेहराव करणं तितकंसं रुचत नाही म्हटलं, तरी पूर्वीप्रमाणेच पारंपरिक लूक ठेवून समारंभ-सोहळ्यामध्ये आजची पिढी अगदी मनापासून सहभागी होताना दिसते. हातामध्ये घड्याळ किंवा ब्रेसलेट घालणारी तरुणी सण-समारंभात हातभर खळखळणाऱ्या हर रंगाच्या विविध बांगडयाही साडीच्या पेहरावानुसार वापरताना दिसून येते.

साड्यांचेही विविध प्रकार दिसून येतात. कपाटभर साडया रोज तर नेसता येत नाहीत. एखादी साडी अगदी मनात भरून जाते आणि त्या साडीचा ड्रेस तयार करण्याचा विचारही मनात येऊन जातो. विविध प्रकारच्या कुर्तीजही नव्या फॅशनच्या रूपात तरुणींचं मन आकर्षित करताना दिसतात. नव्या खरेदीचा ट्रेण्डही तरुण वर्गात दिसून येतो.

साड्यांच्या विविध प्रकारांमध्ये पैठणी, नऊवारी साड्यांचे उपयोग विविध रूपाने केले जातात. घरामध्ये कपाटात हरतऱ्हेच्या साड्या, अगदी जुन्या साड्याही असतात, की ज्यांचा फार कमी वापर होतो. त्या साड्यांचे ड्रेस शिवून वापरले तर त्याचा नवा लूक न्याहाळता येतो. पदराचे डिझाईन, साडीचे जरतारी काठ यापासून ड्रेसखाली नवीन डिझाईन तयार केल्या जाऊ शकतात.

यासाठी पैठणी, कॉटनसाडी, बनारसी साडी, मोठ्या काठाच्या साडय यापासून अनारकली, कुर्तीज बनवू शकतो किंवा वनपीसही चांगला बनवला जाऊ शकतो. साडीचा ड्रेस बनवताना त्यांचा काठ, गोल्डन पदर, हस्तकला आदींचा वापर हातांचं डिझाईन, गळ्याचा भाग, ड्रेसचा घेर आदींसाठी होऊ शकतो. तर लटकनचा वापरही या ड्रेससाठी होऊ शकतो. ब्लॉकलेस, वनपीससाठी बेल्ट आदींचाही वापर येथे होण्यासारखा आहे. साडीपासून अनारखाली ड्रेस हा उत्तमरीत्या होऊ शकतो किंवा घेरदार लेहंगाही. याप्रमाणेच जॅकेट, प्लाझो किंवा वनपीस, शॉर्ट स्कर्ट, टॉप घेरदार स्कर्ट आदींसाठी भरगच्च डिझाईन्सनी भरलेल्या साडयांचा उपयोग होऊ शकतो.

मार्केटमध्ये, मॉलमध्ये साडयंचे किमती ड्रेस आपल्याला भुरळ घालतात. मात्र आपण जर आपल्या घरातील कपाटात असणाऱ्या न वापरण्याजोग्या साडया पाहिल्या तर आपणही उत्तमरीत्या अशा प्रकारचे नव्या फॅशन स्वरूपातील ड्रेस शिवून ते सण, लग्न समारंभात वापरू शकतो.

हातमागावर विणलेल्या कशिद्याच्या साडया म्हणजे जीव की प्राण असतो प्रत्येकीचा, पण एकदा नेसलेली साडी वारंवार वापरण्याचा तोचतोचपणा दिसून येत नाही. साडयांतील व्हरायटी न्याहाळताना जुन्या साडयांचा उपयोग कुणाला देऊन टाकण्यापेक्षा वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस शिवून घेतले तर जुन्याला नवा टच अनुभवास मिळतो.

बनारसी शालूंचा उपयोग घोळदार ड्रेससाठी होऊ शकतो. असे ड्रेस समारंभात चांगले उठून दिसतात. सिल्क साडी, जरीकाठाची साडी, साडीचे डार्क रंग, प्रिंटच्या साड्या, नऊवारी काठ साडया ड्रेससाठी उपयुक्त ठरतात. पैठणी साडया, आदी साड्यांपासून हरेक प्रकारच्या कुर्तीज बनवल्या जाऊ शकतात. कुर्तीजचे आज नानविध प्रकार पाहायला मिळतात. विविध डिझाईनच्या कुर्तीज तरुणींना आकर्षित करतात.

कुर्तीजच्या प्रकारांमध्ये प्रिंटेड कॉटन कुर्तीज, लॉंग कुर्तीज, हॅंडवर्क, एम्ब्रॉयडरी कुर्तीज, हाय लो प्रिंटेड कुर्तीज, कॉटन कुर्तीज, प्लाझो, लेगीन कुर्तीज, पटियाला सोबत कुर्तीज, कॉटन अनारकली कुर्तीज, आदी कुर्तीज तरुणींचे आकर्षण बनल्या आहेत.

शिवाय साड्यांच्या माध्यमातून पर्सचे नवनवीन प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. घरच्या घरीही अशा पर्स बनवल्या जाऊ शकतात. कलरफूल विविध आकाराच्या बॅगा, पर्स आजच्या तरुणींसाठी वापरता येण्याजोग्या ठरणाऱ्या आहेत.

परंपरेला नवा टच देऊन साकारल्या जाणाऱ्या कुर्तीज, बॅगा, पर्स आज जुन्याचा नव्याने वेध घेताना तर दिसून येतात, शिवाय परंपरेची नवी झळाळी यानिमित्ताने अनुभवता येते.

– श्रुती कुलकर्णी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)