सारा हेलॅन्ड आणि वेल्स ऍडम्स यांचे लगिन ठरलं

अमेरिकेतील ऍक्‍ट्रेस सारा हेलॅन्ड आणि ऍक्‍टर वेल्स ऍडम्स यांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अफेअरची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. अखेर त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून लग्न करणार असल्याची घोषणा केली. दोघांनी आपल्या साथीदाराच्या बोटांवर आपल्या नावांच्या अंगठ्या चढवल्या आणि या रिलेशनशीपला अधिकृत करण्याचे निश्‍चित केले.

वेल्सने एका समुद्रकिनाऱ्यावर हेलॅन्डसमोर गुडघ्यावर बसून तिला लग्नाचे प्रपोजल दिले आहे. याच रोमॅंटिक क्षणाचा फोटो हेलॅन्डने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याबरोबर एक रोमॅंटिक कॅप्शनही दिली आहे. “काहीही खाऊ शकत नाही, झोपू शकत नाही. मला अगदी ताऱ्यांपर्यंत पोहोचल्यासारखे वाटते आहे.’ असे तिने म्हटले आहे.

हेलॅन्ड आणि वेल्स यांच्यातील रिलेशनशीप नोव्हेंबर 2017 पासून सुरू आहे. गेल्या वर्षीच त्यांच्यातील हे रिलेशनशीप सर्वांसमोर आले होते. जानेवारी महिन्यात त्यांनी लग्नाबाबत विचार करत असल्याचे प्रथमच सांगितले होते. त्यांनी आपल्यातील मतभेद मिटवले आहेत, हे सांगण्यासाठी चक्‍क कुत्रा आणि मांजरीची उपमा वापरली आहे.

हेलॅन्ड आणि वेल्स यांनी जरी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारायचे ठरवले असले तरी त्यांच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोधच आहे. त्यामुळेच या दोघांनी आपापल्या घरच्यांना या लग्नाच्या विषयापासून दूरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही घरातून होणारा विरोध हा कौटुंबिक कारणासाठी नसून चक्‍क राजकीय कारणांमुळे आहे, हे विशेष आहे. वेल्सच्या कुटुंबीयांनी सारा हेलॅन्डच्या कुटुंबीयांची भेटही घेतलेली नाही. याबद्दल यादोघांना थोडा आनंदच आहे. उगाचच भांडणे नकोत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)