सारडा महाविद्यालयाच्या प्रबंधकाला मुलीशी गैरवर्तनप्रकरणात अटक

नगर – वसतिगृहातातील खोलीत मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्या खोलीत घुसून महाविद्यालयाच्या प्रबंधकाने मुलीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आल्याने नगरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याच्या या कृत्यात वसतिगृहाच्या नाईट वॉर्डनने मदत केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. हिंद सेवा मंडळाच्या नगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयाचा प्रबंधक अशोक मोहनलाल असेरी व वसतिगृहाची नाईट वॉर्डन कुलकर्णी या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशोक असेरी याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलगी ही बीड जिल्ह्यातील असून, ती पेमराज सारडा महाविद्यालयात बी.एस्सी करत आहे. पीडित मुलगी आणखी दोन मुलींबरोबर वसतिगृहातील खोलीत राहते. तीन मार्चला एका मुलीची आई आजारी असल्याने ती घरी गेली. खोलीतील दुसरी मुलगीही बाहेरगावी गेली होती. त्यामुळे पीडित मुलगी खोलीत एकटीच होती. पीडित मुलीने या मुलीला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर रात्री साडेआठ वाजता सोडले. यानंतर मुलगी वसतिगृहातील खोलीकडे निघाली. तेवढ्यात महाविद्यालयाचे प्रबंधक अशोक असेरी याने मुलीला पाहून आवाज दिला. काम आहे, असे सांगून मुलीली त्याने त्याच्या कॅबिनमध्ये बोलविले. मुलगी तिथे आल्यावर तिला कॅबिनचा दरवाजा लावण्यास सांगितला.

असेरी याने यावेळी मुलीशी 15 मिनिटे वसतिगृहाबद्दल विचारणा केली. त्यानंतर मुलीने असेरीला मला जेवण करायचे आहे, असे सांगून तेथून निघून गेली. त्यानंतर त्याच रात्री साडेअकरा वाजता असेरी हा वसतिगृहात आला आणि मुलीच्या खोलीकडे जाऊन तिला दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यावर मुलीने दरवाजा उघडला नाही. दुसऱ्या खोलीत राहत असलेल्या दोन मुली पुढे येऊन पीडित मुलीला आवाज दिला. त्यावेळी असेरी तेथेच होतो. मुलीने दरवाजा उघडल्यानंतर असेरी याने “वसतिगृहाबद्दल बोलायचे आहे, तू ये, असे सांगून वॉचमनला दरवाजा उघडा ठेवायला सांगितला आहे,’ असे सांगून निघून गेला. यानंतर अर्धातासानंतर वसतिगृहाच्या नाईट वॉर्डन कुलकर्णी पीडित मुलीच्या खोलीत आहे. असेरी याने कुलकर्णी याच्या मोबाईलवरून संपर्क करून मुलीशी बोलला.

मुलीने फोन बंद केला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी चार मार्चला रात्री अडीच वाजता मुलगी खोलीमध्ये एकटी असताना कुलकर्णी हिने मुलीचा दरवाजा ठोठावला. मुलीने दरवाजा उघडल्यानंतर कुलकर्णी आणि तिच्या मागोमाग असेरी हा मुलीच्या खोलीत घुसला. असेरी याने या काळात मुलीशी गैरवर्तन केले. त्याचवेळी कुलकर्णी या खोलीतून जात बाहेरून दरवाजा लावून घेतला. यावर मुलीने आरडाओरडा करण्याची धमकी दिली. त्यानंतर असेरीने तेथून पळ काढला, असे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलीची फिर्याद दाखल होताच तोफखाना पोलिसांनी पेमराज सारडा महाविद्यालयाचा प्रबंधक अशोक असेरी याला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)