कार्तिक आर्यनसोबत रोमांस करणार सारा 

काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या चॅट शो “कॉफी विद करण’मध्ये सारा अली खानने अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेट करण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. तिची ही इच्छा पूर्ण होईल की नाही हे निश्‍चित नाही. पण कार्तिकसोबत तिला रोमांस करण्याची संधी मिळाली आहे. साराने नुकताच तिसरा चित्रपट साईन केला असून यात कार्तिक आर्यन झळकणार आहे.
इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटासाठी सारा अली खानला अप्रोच करण्यात आले आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे.

सारासाठी ही मोठी उपलब्धी आहे. कारण साराचा डेब्यू चित्रपट “केदारनाथ’ प्रदर्शित होण्याअगोदरच तिने तीन चित्रपट साईन केले आहेत. सारा अली खान बॉलीवूडमध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत पर्दापण करत आहे, तर “सिंबा’ चित्रपटात रणवीर सिंहसोबत झळकणार आहे. आता तिस-या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसेल.

-Ads-

दरम्यान, कार्तिक आर्यनसोबत डेट करण्याची इच्छा असताना त्याच्यासोबत काम करण्याची मिळालेली संधी सारा कशी नाकारले. साराच्या या इच्छेबाबत कार्तिक आर्यनला विचारले असता तो म्हणाला, याविषयी मी काय म्हणू. मी फक्‍त एवढेच सांगू शकतो की, सारा खुपच सुंदर आहे आणि मी तिच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)