सारा अली खानचा विक्की कौशलला नकार 

सारा अली खानने 2018मध्ये बॉलीवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली. गतवर्षी तिचे दोन चित्रपटही प्रदर्शित झाले आणि हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. “केदारनाथ’नंतर सारा ही रणवीर सिंहसोबत “सिंबा’ चित्रपटात झळकली होती. सध्या इम्तियाज अली यांच्या “लव आज कल 2’च्या शूटिंगमध्ये सारा व्यस्त आहे. या यशामुळे प्रसिद्धीच्या झोतात असल्याने तिच्याकडे अनेक प्रोजेक्‍ट्‌स आहेत. त्यामुळे सारा आता चित्रपट साईन करताना विशेष खबरदारी घेत आहे.

साराला विक्‍की कौशलसोबत एका चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले होते. मात्र, साराने ही भूमिका साकारण्यासाठी नकार दर्शविला आहे. शहीद उधम सिंह यांच्या बायोपिकमध्ये विक्‍की कौशल मुख्य नायकची भूमिका साकारत असून नायिकेसाठी साराशी संर्पक करण्यात आला होता. या चित्रपटातील भूमिकाही दमदार नसल्याचे साराचे मत होते. तसेच या चित्रपटाच्या डेट्‌स “लव आज कल 2’शी क्‍लॅश होत होत्या. त्यामुळे साराने चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
दरम्यान, सारा सध्या दिल्लीत “लव आज कल 2’चे शूटिंग करत आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत काम करत आहे. सिल्वर स्क्रीनवर सारा आणि कार्तिकची फ्रेश जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)