साराने बेसूर गायलेल्या गाण्याचेही झाले कौतुक

“केदारनाथ’मधून पदार्पण करणाऱ्या सारा अली खानच्या ऍक्‍टिंगचे खूप कौतुक होते आहे. तिने आपल्या ऍक्‍टिंगचा पाया पक्का केला आहे. मात्र संगीतातली जाण तिला अगदी जेमतेमच आहे. साराने म्हटलेल्या एका गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. “सिंबा’ या आपल्या दुसऱ्या सिनेमाच्या प्रमोशन प्रसंगी तिने या सिनेमातले “आंख मारे’ हे गाणे गायले होते. त्याचाच हा व्हिडीओ आहे.

या इंटरव्ह्यूच्यावेळी “सिंबा’चा हिरो रणवीर सिंह देखील साराच्या बरोबर होता. त्यानेही साराला गाणे म्हणण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. हे गाणे अगदीच बेसूर आहे. पण तरिही तिच्या फॅन्सकडून तिला या गाण्यासाठी खूप “लाईक’ मिळत आहेत, ही आश्‍चर्याची गोष्ट आहे. खरी गोष्ट म्हणजे साराला गाणे म्हणण्याची विनंती झाली, तेंव्हा तिने अगदी आत्मविश्‍वासाने गाणे म्हणण्याची तयारी दाखवली होती.

तिच्या या आत्मविश्‍वासालाच ही दाद होती, असे म्हणता येऊ शकेल. साराचा हा आत्मविश्‍वासच तिला यापेक्षा अधिक कामगिरी करण्यास बळ देईल. “केदारनाथ’ आणि “सिंबा’नंतर साराला पुढच्या करिअरमध्ये हा आत्मविश्‍वासच मदत करणार आहे. कदाचित ती ऍक्‍टिंग बरोबर सिंगींग स्टारही होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
6 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)