११व्या शतकातील गोरखनाथ १५व्या शतकातील कबिरांना कसे भेटले? आरजेडी नेत्याचा पंतप्रधानांना सवाल

राष्टीय जनता दलाच्या एका जेष्ठ नेत्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश मधील मघर येथे संत कबीर यांच्या स्मृती कार्यक्रमास हजेरी लावली होती. येथे बोलताना पंतप्रधानांनी संत कबीर, गुरु नानक आणि संत गोरखनाथ आध्यात्माविषयक चर्चेसाठी एकत्र बसल्याचे वक्तव्य केले होते.

आरजेडीचे जेष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून त्यांना चांगलेच धारेवर धरले असून संत गोरखनाथ हे ११व्या शतकातील संत असून ते कबीरांच्या आधी ४ शतके होऊन गेले तसेच गुरु नानक देखील कबिरांपेक्षा काही दशकांनी मोठे होते. असे असताना मोदी यांना हा साक्षात्कार कसा झाला हे आम्हाला देखील शिकवावे अशा कोपरखळ्या त्यांनी मोदींना मारल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)