‘संजू’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, एका दिवसात कमावले ३४ कोटी !

रणबीर कपूर अभिनत असलेल्या संजय दत्तच्या बायोपिकने ३४ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. बॉलिवूडमधील खलनायकाचा बायोपिक ‘संजू’ अखेर शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे.
संजू ने ‘रेस ३’ चा पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड तोडला असून बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या अहवालानुसार संजूने पहिल्या दिवशी ३४ कोटी रुपये कमाई केली आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर अशी कलाकारांची फौज आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)