नवी दिल्ली -आयटीसी उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदी संजीव पुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परवा आयटसीचे अध्यक्ष वाय. सी. देवेश्वर यांचे निधन झाल्यानंतर संचालक मंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत संजीव पुरी यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. संजीव पुरी हे 13 मे 2019 पासून कंपनीचे अध्यक्ष झाले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कंपनीचा चौथ्या तिमाहीत ताळेबंद सोमवारी जाहीर करण्यात आला. यानुसार आयटीसी कंपनीचा चौथ्या तिमाहीत नफा 18 टक्क्यांनी वाढून 3481 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 2932 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचा या तिमाहीतील महसूल 14 टक्क्यांनी वाढून 12946 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने प्रति शेअरला 5 रुपये 75 पैसे लाभांश जाहीर केला. कंपनीच्या या ताळेबंद त्यानंतर कंपनीचा शेअर तीन टक्क्यांनी कोसळला असल्याचे दिसून आले.