मध्यप्रदेश : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मेहुण्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भोपाळ – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री ‘शिवराज सिंह चौहान’ यांचे मेहुणे ‘संजय सिंह’ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने ‘संजय सिंह’ हे नाराज होते. ‘संजय सिंह’ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची अधिकृत माहिती दिल्ली येथील पत्रकार परिषदेत दिली.

‘संजय सिंह’ यांनी काँग्रेस मुख्यालयमध्ये मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ‘कमलनाथ’ आणि पक्षाचे नेते ‘ज्योतिरादित्य सिंधीया’ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्विकारले.

मध्यप्रदेशमध्ये 28 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोडांवर संजय सिंह यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश म्हणजे मुख्यमंत्री चौहान आणि भाजपासाठी यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)